पुणे शहरात दिवसाढवळ्या कॉलेज परिसरात युवकाची हत्या…

पुणे : पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे सिंहगड कॉलेजच्या परिसरात असलेल्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये आज (सोमवार) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने युवकावर कोयत्याने सपासप वार करून आणि दगड घालून त्याची हत्या केली आहे. खुनाच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.​

तौकीर शेख (वय २२, रा. धनकवडी, पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. खून झालेला तौकीर शेख याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मिनाक्षीपुरम येथील कृष्णकुंज इमारतीच्या पार्किंगमध्ये तौकीर शेख हा बसलेला होता. आज दुपारी अडीचच्या सुमारास ५ हल्लेखोर तिथे आले. ​या हल्लेखोरांनी अचानक तौकीरवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या तौकीरवर त्यांनी त्यानंतर दगड घालून खून केला. घटना घडल्यानंतर सर्व हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाच हल्लेखोरांपैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ​सिंहगड रस्ता पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. वैयक्तिक वैमनस्य, टोळीयुद्ध किंवा अन्य काही कारण आहे का, याचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

पुणे जिल्ह्यात अनैतिक संबंधातून महिलेची क्रूरपणे हत्या…

पुणे! दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा वारजे माळवाडी पोलिसांकडून उलगडा…

पुणे! बाजीराव रस्त्यावर कोयत्याने केस छाटले अन् बोटही कापले, तिघेही ताब्यात…

पुणे! पत्नी अन् प्रियकरानेच नकुल भोईर यांना संपवलं, प्रियकरला वाचविण्यासाठी…

पुणे! तुझ्यामुळे आम्हाला तुरुंगात जावं लागलं, थेट कोयत्याने वार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!