पुणे! शिवाजीनगर पोलिसांनी सराईत गुन्हेगारास सापळा रचून केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत प्राणघातक हल्ल्यामधील पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगारास शिवाजीनगर पोलिस ठाणे कडून जेरबंद करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मनपा बस स्टॉप भागात १३/११/२०२५ रोजी पेट्रोलिंग करत असताना पोउपनि अजित बडे, पोहवा. १७२८ पोना. २२९७ जाधव, पोशि. १०१२८ सांगवे, पोशि. १०३६९ तायडे असे शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीतील मनपा बस स्टॉप येथे आले असता पोना. २२९७ जाधव व पोशि. १०१२८ सांगवे यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, शिवाजीनगर पोलिस ठाणे गुन्हा रजि. नंबर १७३/२०२५ आर्म अॅक्ट कलम ४(२५), मपोका. कलम ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील तसेच खडकी पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नंबर ३२३ / २०२५ बी. एन. एस. कलक १०९,३५१(३), ३(५), आर्म अॅक्ट कलम ४ (२५), मपोका. कलम
३७ (१) सह १३५ मधील पाहिजे आरोपी अभिषेक गणेश दोरास्वामी हा त्याच्या राहेत घराजवळ आलेला आहे.

पोलिस अधिकारी व अमंलदार यांनी आरोपीच्या राहते घराजवळ जाऊन सापळा रचून त्यास जागीच पोलिस स्टाफच्या मदतीने पकडले. अभिषेक गणेश
दोरास्वामी (वय १९, रा. प्लॉट नंबर ११, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ, शिवाजीनगर पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने दाखल गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त संजय पाटील (अति.कार्यभार सह पोलिस आयुक्त), अपर पोलिस आयुक्त पुर्व व पश्चिम प्रादेशीक विभाग मनोज पाटील, पोलिस उप आयुक्त कृषिकेश रावले, सहा. पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोउपनि अजित बडे, पोहवा. दिपक चव्हाण, पोहवा. राजकिरण पवार, पोना. सचिन जाधव, पोशि सुदाम तायडे, पोशि. श्रीकृष्णा सांगवे यांनी केली आहे.

Video: पुणे शहरातील नवले पुलाजवळ नेमका कसा घडला अपघात, ८ जणांचा मृत्यू…

पुणे! विद्येच्या माहेरघरात तोतया डॉक्टर चालवत होता तब्बल 32 वर्षे दवाखाना…

पुणे! दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा वारजे माळवाडी पोलिसांकडून उलगडा…

पुणे! विद्येच्या माहेरघरात भोंदबाबाचा प्रताप; इंजिनिअर पती अन् शिक्षिका पत्नीला फसवलं…

पुणे! बाजीराव रस्त्यावर कोयत्याने केस छाटले अन् बोटही कापले, तिघेही ताब्यात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!