पुणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर गोळीबार करत टाकला दरोडा…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड) : आंबेगाव तालुक्यात पेट्रोल पंपावर रात्री साडेनऊच्या सुमारास दरोडा पडला असून, आरोपी रोख रक्कम एक लाख नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये घेऊन फरार झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

तांबडे मळा (ता. आंबेगाव) येथील पुणे नाशिक महामार्गाच्या लगत ऋषी पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये शुक्रवारी (ता. ३) रात्री साडेनऊच्या सुमारास चार दरोडेखोरांनी प्रवेश केला. पिस्तुलाचा धाक दाखवून व दमदाटी करून टेबलाच्या ड्रावर मध्ये ठेवलेली रोख रक्कम एक लाख नव्वद हजार तीनशे सत्तर रुपये घेऊन फरार झाले. यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचारी आकाश मच्छिंद्र डोके (वय २४), किसन पवार हे हजर होते. त्यांना चोरट्याने हवेमध्ये गोळीबार करत धमकावले व मंचर च्या दिशेने मोटरसायकल वरून पळून गेले.

मंचर पोलिस स्टेशन मध्ये आकाश मच्छिंद्र डोके (रा. महाळुंगे पडवळ) यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री. यादव पुढील तपास करत आहेत.

पुणे जिल्ह्यात ऐन सणासुदीत पत्नीची हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या…

पुणे जिल्ह्यात वाढदिवसानिमित्त शोभायात्रा; डीजेच्या गाडीने घेतला एकुलता एका मुलचा बळी…

पुणे जिल्ह्यात विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या…

पुणे जिल्ह्यात भाविकांच्या वाहनाला अपघात; ८ महिलांचा मृत्यू; पाहा नावे…

पुणे जिल्हा हादरला! भावकीच्या वादातून पाडला रक्ताचा सडा; हात-पाय तोडले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!