
BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू; महिलेला अटक…
नवी दिल्ली: वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे उपसचिव नवज्योत सिंह (वय ५७) यांचा रविवारी (ता. १५) रात्री अपघाती मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बीएमडब्ल्यू चालवणाऱ्या गगनप्रीत कौर या महिलेला पोलिसांनी आज (सोमवार) अटक केली. तिच्यावर हत्या आणि अपघातानंतर पुरावे नष्ट करण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवज्योत सिंह यांच्यासोबत त्यांच्या पत्नी संदीप कौर होत्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नवज्योत सिंह आणि त्यांची पत्नी संदीप कौर बंगला साहिब गुरुद्वाराहून परत येत होते. त्यानंतर त्यांनी कर्नाटक भवनात जेवण केले आणि घरी परतत असताना गगनप्रीत कौरच्या बीएमडब्ल्यूने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत नवज्योत सिंह यांचा मृत्यू झाला, तर संदीप कौर गंभीर जखमी झाल्या आहेत.
संदीप कौर यांनी पोलिसांना सांगितले की, अपघातानंतर नवज्योत यांचा श्वास सुरू होता. त्यांनी गगनप्रीतला जवळच्या रुग्णालयात नेण्याची वारंवार विनंती केली. मात्र, गगनप्रीतने 19 किलोमीटर दूर असलेल्या रुग्णालयामध्ये नेले. तपासात समोर आले आहे की गगनप्रीतच्या वडिलांचा या रुग्णालयाशी संबंध आहे.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, गगनप्रीतने अपघातग्रस्तांना न्यूलाईफ हॉस्पिटलमध्ये नेले, जेणेकरून मेडिकल रिपोर्ट्समध्ये फेरफार करता येईल. मात्र, रुग्णालय प्रशासनाने सर्व नियमांचे पालन झाल्याचे सांगितले असून गगनप्रीतच्या कुटुंबाचा हॉस्पिटलशी संबंध असल्याचे नाकारले नाही. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटून अपघात; पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू…
माणुसकीला काळिमा! अपघातानंतर हतबल पती अश्रू पुसत हात जोडून उभा राहिला अन्…
नाशिक! दुचाकी-कार अपघातात 7 जणांचा मृत्यू, पाहा मृतांची नावे…
Video: सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये भीषण अपघातात उद्योजकाचा मृत्यू…
हृदयद्रावक! इंद्रायणी अपघातात ‘फादर्स डे’लाच वडील आणि मुलाने गमावला जीव…

