
पुणे जिल्ह्यात भाविकांच्या वाहनाला अपघात; ८ महिलांचा मृत्यू; पाहा नावे…
पुणे: खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जाणाऱ्या महिलांच्या पिकअप वाहनाला आज (सोमवार) दुपारी एकच्या सुमारास भीषण अपघात झाला असून, या अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये 22 महिला जखमी झाल्या असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आहेत.
खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे तिसऱ्या सोमवार निमित्त दर्शनाला जात असताना, नागमोडी वळणावर घाट चढताना गाडी रिटर्न आल्याने महिला भाविकांची पिकअप जीप पलटली. पिकअपने 5 ते 6 पलटी खाल्ल्यानंतर ती रस्त्याच्या कडेला खाली कोसळली. या पिकअपमधून प्रवास करणाऱ्या त्यातील 25 ते 30 महिला भाविकांपैकी आठ महिलांचा मृत्यू झाला असून, इतर महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यापैकी, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीसाठी प्रयत्न केले.
दरम्यान, रुग्णवाहिकांच्या माध्यमातून जखमींना खासगी रुग्णालयात व चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.
जखमी भाविकांना पुढील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
साळुंखे हॉस्पिटल
1. शकुंतला तानाजी चोरगे (वय 50)
2.चित्र शरद करंडे (वय 32)
3. चंद्रभागा दत्तात्रय दरेकर
4. मंदा चांगदेव पापल (वय 55)
शिवतीर्थ हॉस्पिटल
1. लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर (वय 55)
2. कलाबाई मल्हारी लोंढे (वय 55)
बांबले हॉस्पिटल
1. कविता सारंग चोरगे (वय 35)
2. सिद्धिक रामदास चोरघे (वय 21)
3. छबाबाई निवृत्ती पापळ (वय 60)
गावडे व्हॉस्पटिल
1. शंकुतला चोरघे
2. मनीषा दरेकर
शिवतीर्थ हॉस्पटिल
1. लक्ष्मी चंद्रकात कोळेकर
2. कलाबाई मल्हारी लोंढे
3. रुषिकेश करंडे
4. जनाबाई करंडे
5. फसाबाई सावंत
6. सुप्रिया लोंढे
7. निशांतलोंढे
साईनाथ हॉस्पीटल
1. सुलोचना कोळेकर
2. मंगल शरद दरेकर
पोखरकर व्हॉस्पटिल
1. लता करडे
मृत्यू झालेले भाविक पुढील हॉस्पिटलमध्ये…
साळुंके व्हॉस्पीटल
1. शोभा जानेश्वर पापळ
2. सुमन काळुशम पापळ
3. शारदा रामदास चोरघे
4. शंकुतला तान्हाजी चोरघे
चांडोली व्हॉस्पीटल
1. मंदा कान्हीफ दरेकर
2. संजीवनी कैलास दरेकर
3. मीराबाई संभाजी चोरघे
गावडे व्हॉस्पीटल व्हॉस्पीटल
1. बायडाबाई दरेकर.
माणुसकीला काळिमा! अपघातानंतर हतबल पती अश्रू पुसत हात जोडून उभा राहिला अन्…
नाशिक! दुचाकी-कार अपघातात 7 जणांचा मृत्यू, पाहा मृतांची नावे…
पुणे! जेजुरीजवळ भीषण अपघातात 7 जण जागीच ठार; पाहा नावे…
इंद्रायणी नदीवरील पूल अपघातातील जखमी आणि मृतांची नावे पाहा…
Video: पुणे शहरात ट्रकने महिलेला चिरडले; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद…

