
हृदयद्रावक! नवविवाहित युवतीचा बाथरूममध्ये तडफडून मृत्यू…
सोलापूर: सोलापूरच्या माढ्या तालुक्यात एका नवविवाहित युवतीचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नवविवाहित युवती अंघोळीच्या बाथरुममध्ये असताना एका अनर्थामुळे तिचा जागीच तडफडून मृत्यू झाला. माढा पोलिस पुढील तपास करत आहेत.
साक्षी रणवीर चांगभले (वय २२) असे नवविवाहित युवतीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचे माढ्यातील एका युवकासोबत विवाह झाला होता. नवविवाहित युवती अंघोळीच्या बाथरुममध्ये गेली होती. तिथे हिटर लावून पाणी गरम करायला लावला होता. यावेळी हिटरला धक्का लागल्याने विवाहितेला विजेचा जोरदार धक्का बसला, त्या बाथरुममध्येच खाली कोसळल्या. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने विद्युत प्रवाह बंद केला. तसेच साक्षीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.
रुग्णालयात जाताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साक्षी चांगभले यांना मृत घोषित केले. नवविवाहित युवतीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! ‘साई’ नावाच्या तिन मित्रांनी घेतला एकाच वेळी जगाचा निरोप…
हृदयद्रावक! नविवाहित युवतीने घेतला जगाचा निरोप; व्हॉट्सअॅपवर म्हटले की…
हृदयद्रावक! मुलाने बसमधून काढले बाहेर डोके आणि झाले धडावेगळे…
हृदयद्रावक! कोल्हापूर जिल्ह्यातील नवदाम्पत्याचा गुदमरून मृत्यू…
हृदयद्रावक! डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच एअर होस्टेस रोशनीने घेतला जगाचा निरोप…

