RCB विजय मिरवणूकीत चेंगराचेंगरी, 11 जणांचा जागीच मृत्यू…

बंगळुरू : आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) संघाची व्हिक्टरी परेड पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेटवर मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींचा आकडा मोठा असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

रजत पाटीदार आणि विराट कोहलीच्या RCB ने फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा पराभव करुन आयपीएल 2025 च्या चषकावर नाव कोरले. तब्बल 18 वर्षांनी RCB ने मिळवलेल्या विजयामुळे कर्नाटकसह विराटच्या चाहत्यांचा उत्साह प्रचंड आहे. बंगळुरुमध्ये अनेक चाहते चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी जमा झाले होते. आरसीबीच्या आयपीएल विजेतेपदाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले आहेत.

बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना चेंगराचेंरी झाली. यावेळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी आरसीबीच्या चाहत्यांवर सौम्य लाठीचार्ज देखील केला. चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेट क्रमांक 3 जवळ चेंगराचेंगरी सारखी स्थिती निर्माण झाली होती. स्टेडियमजवळचे रस्ते चाहत्यांच्या गर्दीने जाम झाले होते. यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली. आरसीबीची विजेती टीम विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी मैदानात दाखल होत असताना हा प्रकार घडल्याची माहिती आहे. काही जखमींना शिवाजीनगर भागातील बॉवरिंग हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

आरसीबीची टीम चिन्नास्वामी मैदानावर दाखल होण्यापूर्वी कर्नाटकच्या विधानसौदामध्ये मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी टीमचा सत्कार केला होता. आरसीबीने आयपीएलच्या 18 व्या हंगामाचे विजेतेपद पंजाब किंग्जला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 6 धावांनी पराभूत करत जिंकलं यानंतर बंगळुरुत काल रात्रीपासून विजयाचा जल्लोष करण्यात येत आहे.

हृदयद्रावक! इंजिनिअरींगचे शिक्षण घेणाऱ्या युवतीचा तडफडून मृत्यू…

IPS जालिंदर सुपेकर यांच्याबाबत सुरेश धस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…

हृदयद्रावक! गर्भवती विवाहितेने उचचलं टोकाचं पाऊल; धक्कादायक कारण…

हृदयद्रावक! गर्भवती विवाहितेने उचचलं टोकाचं पाऊल; धक्कादायक कारण…

धुळे हादरलं! जवानाला कॉलेजचं प्रेम पुन्हा घावलं अन् पत्नीला संपवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!