
लग्नाळू आजी-आजोबांची उतारवयात बहरली लव्ह स्टोरी अन् एक दिवस…
मुंबई: डोंबिवलीमध्ये एका ७३ वर्षांच्या आजोबाने एका ६२ वर्षांच्या वृद्ध आजीबाईंना लग्नाचे आमिष दाखवले आणि गोड बोलून आजींना तब्बल 57 लाख 40 हजारांना या लग्नाळू आजोबांनी फसवले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम भागात ही घटना घडली आहे. या भागात पीडित वृद्ध महिला एकटीच राहत होती. या उतारवयात आपल्यासोबत कुणी असायला पाहिजे असा त्या विचार करत होत्या. त्यांनी अनुज तिवारी नावाच्या 73 वर्षांच्या वृद्धालाही उतारवयात जोडीदार हवाय, अशी ‘समवयस्कर जोडीदार पाहिजे’ अशी जाहिरात पाहिली. मग या महिलेने अनुज तिवारी यांच्याशी संपर्क केला.
दोघांचे प्रथम फोनवर बोलणं झाले. पुढे हळुहळु संपर्क वाढत गेला. नियमित दोघे बोलू लागले. त्यानंतर भेटीगाठी सुरू झाल्या. उतारवयात लव्ह स्टोरी बहरायला आली. तिवारीने हळूहळू वृद्ध महिलेची सर्व माहिती गोळा केली. ही महिला डोंबिवलीमध्ये एकटी राहते. मागे पुढे फारसं कुणी नाही, हे त्याच्या लक्षात आले. तिवारीने या महिलेचा विश्वास संपादन केला. आपण दोघेही एकत्रित पुण्यात एक घर घेऊन राहू, असे आश्वासन त्या वृद्ध महिलेला दिले. आपणास चांगला जोडीदार मिळतो असा विचार करून फसवणूक झालेल्या महिलेने अनुजवर विश्वास ठेवला.
अनूज तिवारी हा पीडित महिलेच्या डोंबिवलीतील घरी येऊन राहू लागला. आपण लग्न करून एकत्र राहू असं तो सांगत होता. मग त्याने घर घेण्याच्या बहाण्याने पैशांची मागणी सुरू केली. वृद्ध महिलेकडून ३५-लाख रूपये टप्प्या-टप्प्याने काढून घेतले. घर खरेदीच्या बनावट पावत्या त्याने महिलेला दाखवल्या. डोंबिवलीतील घरात राहत असताना तिवारीने घरातील कपाटातील २०-तोळ्याचे सोन्याचे दागिने वृद्ध महिलेला न नकळत चोरले. डेबिट कार्ड चोरून बँकेतून ०२-लाख ४० हजार रूपयांची रक्कम सुद्धा काढून घेतली. एकूण ५७ लाख ४० हजार रूपयांचा ऐवज तिवारीने लुटला. पैसे हातात आल्यानंतर तिवारी गायब झाला अन् वृद्ध महिलेशी बोलणंही बंद केले.
तिवारी असा अचानक बोलत का नाही, यामुळे वृद्ध महिलेला संशय आला. तिने घरातील कपाटात पाहणी केली तेव्हा तिला धक्का बसला. कपाटातून सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाली हे वृद्ध महिलेला लक्षात आल्यानंतर वृद्ध महिलेला मोठा धक्का बसला. तिने लगेच डोंबिवली विष्णुनगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि सगळी हकीकत सांगितली. पोलिसांनी वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तिवारीवर फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
लग्नाच्या दिवशीच नवरीच्या प्रियकराने केला नवरदेवाचा खून…
‘लुटेरी दुल्हन’ अखेर सापडली! तब्बल २५ लग्न, दिवसातून ३ वेळा अंघोळ अन्…
सहाच महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या सुनेने काढला सासूचा काटा; कारण आले समोर…
प्रेयसीचं लग्न ठरल्यानंतर शेवटचं भेटायला बोलावलं अन् झाला शेवट…
भावांनो, तुम्ही लग्न करा, पण दोन्ही गोष्टी घडल्या नाही, तर तुम्हालाही…

