
Video: पुणे शहरात धुमाकूळ घातलेल्या कोयता गँगची पोलिसांनी काढली वरात…
पुणे: पुणे शहरात कोयता गँगने दोन दिवसांपूर्वी दत्तवाडी परिसरात टोळक्याने एका युवकाचा दिवसाढवळ्या पाठलाग करून कोयत्याने सपासप वार केले होते. ही घटना ताजी असताना पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने हैदोस घातला आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपींना अटक करून, ज्या भागात दहशत केली त्याच भागात त्यांची वरात काढली आहे.
पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरात ८ ते १० जणांच्या टोळीने शुक्रवारी मध्यरात्री हातात कोयते आणि धारदार शस्त्रं घेत धुमाकूळ घातला. भर वस्तीतील गाड्या फोडत त्यांनी मोठंमोठ्याने शिवीगाळ केली. आरोपींनी एका मित्राला मारहाण करत गाड्यांची तोडफोड केली. हा सगळा प्रकार स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. मध्यरात्री अशाप्रकारे तरुण नंग्या तलवारी आणि कोयते घेऊन फिरत असल्याने परिसरात एकच दहशत निर्माण झाली होती.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी ८ ते १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कोयते, लाकडी दांडके आणि इतर जीवघेणी हत्यारं घेऊन दहशत पसरवल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. बिबवेवाडी पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर…
www.puneganpati.com
Video: पुणे शहरात भरदिवसा युवकावर कोयत्याने सपासप वार…
पुणे पोलिस दलात खळबळ! वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल…
पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…
पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…
पुणे! दिपक मानकर यांनी केली पोलिसांची दिशाभूल; गुन्हा दाखल…
गुंड गजा मारणे मटण पार्टी प्रकरणी मास्टरमाइंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

