
Video : महिलेने बुरख्याच्या आत काय दडवलंय पाहाच…
पाटणा (बिहार): एका महिलेने दारू तस्करी करण्यासाठी बुरखा वापरण्याचा एक अनोखा मार्ग शोधला. एका महिला कॉन्स्टेबलने महिला तस्कराला तिचा बुरखा काढण्यास सांगितले तेव्हा ती घाबरली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कटिहारमध्ये उत्पादन शुल्क विभागाने बुरख्यात दारूची तस्करी करणाऱ्या एका महिलेला पकडले आहे. कटिहारमधील महिला दारू तस्करच्या पद्धत पाहून सर्वजण थक्क झाले. पश्चिम बंगालमधील कुमेदपूरमध्ये संध्या देवी नावाची एक महिला बुरखा घालून रेल्वेमध्ये प्रवास करत होती. उत्पादन शुल्क विभागाला माहिती समजली की, एक महिला तस्कर नऊ लिटर परदेशी दारू घेऊन येत आहे. मानिया स्टेशनजवळ एका महिला कॉन्स्टेबलने महिला तस्कराला तिचा बुरखा काढण्यास सांगितले तेव्हा ती घाबरली. पोलिसांच्या कडक कारवाईनंतर जेव्हा महिलेने तिचा बुरखा काढला तेव्हा पोलिसही थक्क झाले.
महिलेने तिच्या साडीवर दारूचे टेट्रा पॅक टेपने बांधले होते. यानंतर तिने त्यावर बुरखा घातला. चौकशीदरम्यान महिलेने तिचे नाव संध्या आणि गाव माझेली सांगितले. पोलिसांनी संध्यादेवीला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आप राजा और रंक” की लोकप्रिय कहानी से परिचित होंगे। ये एक राजकुमार और एक गरीब व्यक्ति के बीच पहचान बदलने की कहानी है। आज उसके लगभग शब्द शराबबंदी से टकरा रहे है. पीने वाला रंक बनता जा रहा है और बेचने- बेचवाने वाला राजा। बिहार में हर माध्यम से शराब मंगवाए जा रहे हैं? pic.twitter.com/TjPrkuWSso
— Shri Dhiraj Sharma (Journalist) (@ShriDhiraj) April 18, 2025
एअर होस्टेस हर्षिता शर्मा हिचा अपघाती मृत्यू तर मित्र किरकोळ जखमी…
सासूने होणाऱ्या जावयासह पळून जाण्याचं पोलिसांना सांगितलं खरं कारण…
Video: नवरा कामासाठी घराबाहेर अन् पत्नीने बालावले घरी; पकडले रंगेहाथ…
हृदयद्रावक Video! महाविद्यालयाच्या निरोप समारंभात हसवलं अन् बोलता-बोलता कोसळली…
हृदयद्रावक Video! बहिणीच्या लग्नात नाचताना युवतीचा मृत्यू…

