यवतमाळ शहर पोलिसांनी घरफोडीच्या आरोपीकडून केले सोन्याचे दागिने जप्त…

घाटंजी (यवतमाळ) : यवतमाळ शहर पोलिसांनी घरफोडीच्या आरोपीकडून सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. याबाबतचा पुढील तपास करत आहेत.

यवतमाळ शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बांगरनगर येथील तक्रारदार सुजर बैस (३९) हे २७ डिसेंबर २०२४ रोजी वडीलांची प्रकृती बरी नसल्याने ते सहकुटुंब पिंपरी बुटी या गावी गेले होते. बैस कुटूंबीय ३० डिसेंबर २०२४ रोजी यवतमाळ येथे परत आले. घरी परतल्यावर घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील अलमारीतील साहित्य अस्ताव्यस्त झाले होते. अलमारीतील पत्नीची ३० ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र चोरी गेल्याचे लक्षात आले.

सदर प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केरुन प्रकरण तपासात घेतला. ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांनी गुन्हा उघडकीस आणण्याकरीता वेळो वेळी सखोल असे मार्गदर्शन केल्याने शहर पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकट पथकाने घरफोडीतील एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचे कडून २९.६०० ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र जप्त करण्यात आले.

संबंधित गुन्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने, परिविक्षाधिन पोलिस उप अधीक्षक रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास दांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय आत्राम, पोहे रावसाहेब शेंडे, प्रदीप नाईकवाडे, पोलिस नायक मिलींद दरेकर, पोलिस शिपाई प्रदीप कुराडकर, गौरव ठाकरे, अभिषेक वानखडे, अश्वीन पवार आदींनी घरफोडीची घटना उघडकीस आणली आहे.

तानाजी सावंत यांच्या मुलाची पुणे पोलिसांनी घेतली झाडाझडती; प्रतिप्रश्न करताच…

पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन् समोर पाहताच…

पोलिसकन्या संस्कृतीच्या हत्येचं गूढ 10 दिवसानंतरही कायम…

विवाहित महिलेचा खून केल्यावर प्रियकराने केला मृतदेहावर बलात्कार…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!