
बीड! प्रेयसीच्या दारात जाऊन खिडकीतून केला गोळीबार…
बीड : आंबेजोगाई तालुक्यामध्ये प्रेयसीने बोलणं बंद केल्याने थेट तिच्या दारात जाऊन खिडकीतून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवतीच्या घरातील नागरिक दुसऱ्या खोलीत असल्यामुळे सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. या घटनेनंतर पुन्हा एकदा बीडमधील शस्त्र परवाना आणि गावठी कट्टाचा मुद्दा समोर आला आहे.
गणेश पंडित चव्हाण (वय 24) याने गोळीबार केला असन, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गणेश याचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गणेशच्या त्रासाला कंटाळून युवतीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. यानंतर गणेशने युवती व तिच्या कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याच रागातून तो आंबेजोगाईमध्ये आला होता. यावेळी त्याने थेट युतीच्या घरी जात तिच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून दरवाजा कोणीच न उघडल्याने गावठी कट्टातून त्याने खिडकीतून गोळीबार केला.
गोळीबार केल्या त्यावेळी कुटुंबातील सदस्य दुसऱ्या खोलीमध्ये असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. हा गोळीबार गावठी कट्ट्यामधून करण्यात आला. पोलिसांनी गणेश चव्हाण याला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
बहिणीवर प्रेम! मित्राचा खून केला आणि अंत्यसंस्काराला उपस्थितही राहिला अन्…
बीड! मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या कामगाराचा संशयास्पद मृत्यू…
विवाहीत प्रेयसीच्या नवऱ्याला दुचाकीवर बसून घेऊन गेला अन् पुढे…
Video: प्रेयसीला दुसऱ्या मुलासोबत पकडले रंगेहात अन् भररस्त्यातच…
धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर…

