पुणे! कार कोसळली नाल्यात अन् लष्करी अधिकाऱ्यामुळे वाचला चालकाचा जीव…

पुणे: पुणे शहरातील वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील भैरोबा नाल्यावरील पुलावर झालेल्या भीषण अपघातात चारचाकी गाडी अनियंत्रित होऊन थेट नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला होता. मात्र, प्रसंगावधान राखत लष्करी अधिकारी आशिष कुमार यादव यांनी तत्काळ मदत करत चालकाचा जीव वाचवला आहे.

आशिष कुमार यादव यांना पुलावरून जात असताना रस्त्यावर मोठी गर्दी दिसली, चौकशी केल्यावर नाल्यात पडलेली चारचाकी पडल्याचे कळले. वाहनात हालचाल होत असल्याचे जाणवताच आत कोणी अडकले असावे, असा संशय आल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नाल्यात उतरून पाहणी केली. कारमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत अडकलेली दिसली.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी गाडीची काच फोडून त्या जखमी चालकाला बाहेर काढले. त्या वेळी त्याच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. लष्करातील प्रशिक्षणाचा उपयोग करत यादव यांनी तातडीने रुमालाने नाकावर दाब देऊन रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला नाल्याबाहेर काढले. गाडीत एक ते दीड लाख रुपये होते. चालक शुद्धीवर आल्यानंतर त्याच्याजवळ असलेली रोख रक्कमही त्यांनी प्रामाणिकपणे परत दिली. यानंतर टेम्पोच्या मदतीने त्या जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वानवडी बाजार पोलिस चौकीचे पीएसआय बाळासाहेब वाकडे यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, जखमी चालकाला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी नाल्यात पडलेली कार बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या मदतीने कारवाई सुरू केली. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आशिष कुमार यादव यांच्या धाडसी आणि माणुसकीपूर्ण कृतीचे विशेष कौतुक केले आहे. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

पुणे अपघात! कारला चावी तशीच राहिली अन् 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक…

Video: पुणे शहरातील नवले पुलाजवळ नेमका कसा घडला अपघात, ८ जणांचा मृत्यू…

Video: पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ थरार! मैत्रिणीला फोन लावण्यावरुन सपासप वार…

पुणे! प्रियकराला संपवलं पण सिग्रेट अन् दारुच्या बाटलीने अडकवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!