
समर्थ पोलिस लाईन येथील विद्यार्थ्यांचे सिलंबम स्पर्धेत घवघवीत यश…
पुणेः पुणे जिल्हास्तरीय सिलंबम स्पर्धेमध्ये समर्थ पोलिस लाईन येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. प्रथमच खेळत असताना दुसऱ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप सुद्धा जिंकून आणली. सर्व पदक विजेते खेळाडूंना प्रशिक्षक सुनील सांबारे आणि शक्ती प्रसाद पात्रा यांचे मार्गदर्शन लाभले. 13 व 14 जुलै रोजी ही स्पर्धा झाली आहे.
‘पोलिसकाका न्यूज मीडिया’ नेहमीच पोलिसांच्या कार्याची कर्तव्याचे दखल घेत आहे. पोलिस काका टीमने पोलिस बांधवांच्या पाल्यांसाठी एक संकल्पना साकारण्याचा प्रयत्न करून सेल्फ डिफेन्स च्या माध्यमातून लाटी काठी तलवार दांडपट्टा भाला सुरूल कराटे किक बॉक्सिंग आणि योगा प्रशिक्षण अगदी अल्प दरामध्ये करण्याचा विचार सुरू केला आणि अगदी अल्पवधीतच मुलांनी पालकांनी एक छान प्रकारे साथ दिली आणि विद्यार्थी घडवण्यास सुरुवात केली.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
शालेय खेळ स्पर्धा महापौर चषक असोसिएशनच्या स्पर्धा यामधूनच यांची मुलांची तयारी करून घेतली जाते आणि त्याचबरोबर त्यांच्या सेल्फ डिफेन्स बरोबरच व्यायामाचे सुद्धा त्यांना आवड निर्माण केली जाते आणि त्यातूनच त्यांची शारीरिक बौद्धिक क्षमता वाढ होण्यास मदत होईल. प्रशिक्षण समर्थ पोलिस स्टेशन शेजारील समर्थ पोलिस लाईन येथील पाळणाघर घराचे शेड येथे चालू असते, असे प्रशिक्षक सुनील सांबारे यांनी सांगितले.
6 गोल्ड मेडल
1} राजवीर पंडित
2) श्रीया सांबारे गोल्ड मेडल 2
3) गगन जोशी
4) आयुष्य वसेकर
5) श्री कातोरे
5 सिल्वर मेडल
1) रमा परांजपे
2) अबीर पाटील
3) प्रथमेश चौधरी
4) आरोही मलगुंडे
5) विराज रणपिसे
6) यज्ञ रोकडे
15 ब्रॉंझ मेडल
1) प्रणोती भोंगळे
2) सौम्या शेजाळे
3) पियुष खवळे – BRONZ
4) माही थोरात 2 ब्रॉंझ
5) आराध्या राऊत
6) दिव्यांका असवले
7) स्वरा होले
8) गौरव नाईक
9) परनिका कोळी
10) स्पृहा घोरपडे
11) शर्वी थोरात
13) शार्दुल भालेराव
14) रुद्र ओहोळ
15) तनाज शेख
पोलिसकाका Video News: २४ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

