
शेअर मार्केट! पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चौघांना केली अटक; धागेदोरे बँकॉक पर्यंत…
पुणे (सुनिल सांबारे): शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणुक करुन जास्तीत जास्त पैसे मिळून देण्याचा बहाणा करणाऱ्या आरोपींचे धागेदोरे बँकॉक पर्यंत पोहचले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सदर गुन्हयात चार आरोपींनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
IBKR, Cresset Acadamy, Goldman Sachs या व्हॅटसअप ग्रुपचा वापर करुन फिर्यादी यांचे कोटयावधी रुपयाची फसवणुक करत असल्याने IBKR Securities, Cresset Acadamy, Goldman Sachs या कंपनीविरुध्द एकुण १०६९५७५/- रु आर्थिक फसवणुक केलेबाबत तक्रारदार यांनी वाकड पोलिस स्टेशन येथे गु.र.नं ३०६ / २०२४ भा.द.वि. कलम ४१९, ४२० आय.टी. अॅक्ट ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हयाची व्याप्ती खुप मोठया प्रमाणावर असल्याने पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सदरचा गुन्हा पोलिस निरीक्षक, सायबर सेल, गुन्हे शाखा यांच्याकडे वर्ग करण्याचे आदेशित केले होते. सदर गुन्हयात आतापर्यंत ०४ आरोपी अटक करण्यात आले आहेत.
सदर गुन्हयाचा अधिक तपास केला असता यातील आरोपी फसवणुकीच्या पैशातून गुजरात येथील सोनाराच्या दुकानातुन सोने खरेदी करत असल्याची माहीती सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक प्रविण स्वामी यांना माहिती मिळाली होती. सदर माहीतीच्या अनुषंगाने व फिर्यादी यांनी आरोपीच्या अकाऊंटला भरलेल्या पैसे यांचे तांत्रिक विश्लेषण करुन गुजरात येथून आरोपी अमित जगदिशचंद्र सोनी यास ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने सांगीतले की तो सोन्याचे व्यापारी यांच्याकडून सोने घेऊन त्याचे कॅश मध्ये रुपांतर करुन अहमद नजीर गाझी याला देत होता. अहमद नजीर गाझी हा ती कॅश मुफ्दल व त्याचा भाऊ आबिद याला यु. एस. डी. टी. मध्ये क्रिप्टोकरन्सी खरेदी करुन पाठवत होता. आरोपी अहमद याचा सख्खा भाऊ आबिद व मुफ्दल हा बँकॉक मध्ये राहुन तेथील आंतराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीसोबत काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीने अद्यापर्यंत ६ अकाऊंटमधील पैसे काढून कॅश त्याचे यु.एस. डी. टी मध्ये बँकॉक ला पाठविल्याचे दिसुन येत आहे. आरोपीच्या एकूण ६ अकाऊंटविरुध्द भारतामध्ये एकुण १७७ तक्रारी अर्ज प्राप्त झाले असून १०० कोटीपेक्षा जास्त रकमेची फसवणुक झालेली आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, वसंत परदेशी अपर पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड, संदिप डोईफोडे पोलिस उपआयुक्त, गुन्हे पिंपरी चिंचवड, विशाल हिरे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि वैभव शिंगारे, सपोनि सागर पानमंद, सपोनि प्रविण स्वामी, पोलिस उपनिरीक्षक सागर पोमन, पोशि २५६३ अतुल लोखंडे, पोशि २५६२ बिचेवार पोशि २३०० कृष्णा गवळी, पोशि ३५३६ रजनिश तारु (सर्व नेमणुक सायबर सेल) यांच्या पथकाने केली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील ड्रग्स प्रकरणात पोलिस अधिकाऱ्याला बेड्या…
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दरोडयातील आरोपी २४ तासात केले जरेबंद; पाहा नावे…
पिंपरी-चिंचवड हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपींना भोसरी पोलिसांनी केले जेरबंद…
पिंपरी-चिंचवडमध्ये दहशतवाद विरोधी शाखेची मोठी कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

