पुणे शहरात युवकाचा खून करणाऱ्या आरोपींना १२ तासाच्या आत जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील येवलेवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडण्याच्या वैमनस्यातून युवकाचा खुन करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी १२ तासाच्या आत जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

येवलेवाडी पोलिस स्टेशन अंतर्गत येवलेवाडी कमानीच्या पुढे, मिनू मेहता सोसायटीकडे जाणारे कच्च्या रोडवर, आकाश कृष्णा चाबुकस्वार (वय २१ वर्षे, रा. फुरसुंगी, पुणे) याचा रस्ता आडवून जुन्या भांडण्याच्या कारणावरुन वाद घालुन एकूण सात आरोपी यांनी आकाश चाबुकस्वार यांस लाथा बुक्यांनी मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घालुन निघृण खुन केला म्हणून येवलेवाडी पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. ०२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), १८९ (२), १९०, १९१ (२), महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१) (३), १३५ प्रमाणे दाखल होता.

गंभीर गुन्हा करून फरार झालेल्या आरोपींच्या शोध घेणे बाबत पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – ५ यांनी तपास पथकाच्या तात्काळ दोन टिम तयार
करुन पाहिजे आरोपींचे शोध घेणे कामी रवाना केल्या. सदर तपास पथकातील पोलिस अधिकारी सपोनि राकेश जाधव व अमंलदार सुजीत मदन यांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी
१) आदित्य सुभाष गायकवाड, वय १९ वर्षे, रा.गोकुळनगर, कोंढवा, पुणे
२) गणेश किशोर मोरे, वय २० वर्षे, रा. कात्रज-कोंढवा, पुणे
३) कौशल्य उर्फ ऋषी जनार्धन मारे, वय १९ वर्षे, रा. तुळजाभवानी निवास, कोंढवा, पुणे. यांना लागलीच ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

सदरची कामगिरी अपर पोलिस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग, मनोज पाटील, पोलिस उपआयुक्त परि.०५, राजलक्ष्मी शिवणकर, सहा. पोलिस आयुक्त, वानवडी विभाग, नम्रता देसाई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अमर काळंगे यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलिस निरीक्षक राकेश जाधव, पोलिस अंमलदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, सुषमा हिंगमिरे, संदिप पवार, गणेश चिंचकर, अभिजीत जाधव, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, विजय खेगरे, अनिल बनकर, मयुर मोरे, अमोल तावरे व अक्षय शेंडगे यांनी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

पुणे शहरातील २०२५ मधील गुन्हेगारी वास्तव आणि पोलिस आयुक्तांचे धडाकेबाज निर्णय…

पुणे बॉम्ब स्फोटातील जामिनावरील आरोपीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या…

पुणे! आयुष कोमकरच्या आईचा ‘तो’ Video समोर; प्लिज, असं करू नका…

पुणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर; मुलाची गळा चिरून हत्या…

पुणे! रिक्षाचालकाचं निर्दयी कृत्य ५ महिन्यांनी उघड, थेट दिल्लीतून अटक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!