
पुणे! युवतीने 9व्या मजल्यावरून घेतली उडी; हृदयद्रावक चिठ्ठी…
पुणे: पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात गुरुवारी (ता. २७) सायंकाळी उशिरा एका युवतीने 9व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी पीडित युवतीची ओळख पटवली असून तिने आत्महत्या करण्याआधी लिहिलेली सुसाईड नोटही पोलिसांना सापडली आहे.
मानसी (वय १९) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. सुसाइड नोटमध्ये आत्महत्येचं कारणही सांगितले आहे. “मी घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही. मला या कामाचा कंटाळा आल्याने स्वतःहून हे टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करीत आहे,” असे म्हणत तिने जीवन संपवले आहे. बुधवार पेठेत युवतीने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवती मागील काही काळापासून याच इमारतीत वास्तव्याला होती. गुरुवारी सायंकाळी अचानक तिने टोकाचं पाऊल उचलले आहे. या घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, या घटनेचा पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.
पुणे! भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी भावाची आत्महत्या; ताई त्यांना सोडू नको…
पुणे! NDA मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…
पुणे जिल्ह्यात ऐन सणासुदीत पत्नीची हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या…
पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…
पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…

