पुणे शहरात रेकॉर्डवरील गुन्हेगाराने संपवलं आयुष्य…

पुणे: पोलिस ठाण्यात समुपदेशनासाठी बोलावण्यात आलेल्या एकाने कृषी महामंडळाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. १८) सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास घडली आहे.

समीर हमीद शेख (वय 40, रा. गल्ली नं. 13, आंबेडकर नगर, मार्केटयार्ड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. समीर शेख हा रेकॉर्डवरील आरोपी होता. त्याची मानसिक स्थिती अस्थिर होती आणि तो काही काळापासून नशेच्या आहारी गेला होता. घटनेच्या दिवशी त्याने नशा केल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, समीर शेख वारंवार आत्महत्येचा प्रयत्न करत होता. 16 नोव्हेंबर रोजीही त्याने पुलगेट चौकाजवळील उड्डाणपुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नांमुळे पोलिसांनी त्याला समुपदेशनासाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. समुपदेशन सुरू असतानाच, संधी साधून समीरने कृषी महामंडळाच्या उंच इमारतीकडे धाव घेतली आणि तिथून थेट खाली उडी मारली.

दरम्यान, समीर शेख हा व्यसनमुक्ती केंद्रातील समुपदेशकांना काही न सांगता बेपत्ता झाला होता. घरी परतल्यानंतर त्याने पत्नीला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास त्याने मार्केट यार्ड पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या छतावरून उडी मारली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पुणे शहरात चिमुकल्याला सावत्र आई-वडिलांकडून बेदम मारहाण; गुन्हा दाखल…

पुणे! हिंजवडीत वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू…

पुणे शहरात दिवसाढवळ्या कॉलेज परिसरात युवकाची हत्या…

Cyber Crime! पुणे शहरातील नागिरकांना आमिष दाखवत 97 लाखांची फसवणूक…

पुणे! नवले पूल अपघतात अभिनेत्याचा मृत्यू! चिमुकला झाला पोरका…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!