
नाशिक! देवदर्शनासाठी जाणाऱ्या व्यक्तीवर पहाटेच्या सुमारास हत्या…
नाशिक: नाशिक रोडच्या जय भवानी रोड परिसरात आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
अमोल मेश्राम असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज पहाटेच्या वेळी ते मंदिरात दर्शनासाठी जात होते. यावेळी त्यांच्यावर अचानक अज्ञाताने कोयत्याने वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, या हल्ल्यात अमोल यांचा जागीच मृत्यू झाला. भल्या सकाळी अशाप्रकारे हत्येची घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून खून, हाणामाऱ्या आणि तोडफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या नऊ महिन्यांत नाशिक शहरात तब्बल ४४ खून झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिककरांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
नाशिक! गर्लफ्रेंडमुळे तीन वर्ष जगायला मिळाली; लव्ह यू अन् गूड बाय…
नाशिक पोलिस दलात मोठे फेरबदल; पाहा नावे…
नाशिक! माझ्या हॉटेलमध्ये कॉलगर्ल्स पुरवल्या जातात, आता तुम्ही तेच काम करा…
नाशिक! नवविवाहित पत्नीच्या प्रियकराकडून नवऱ्याचे अपहरण करण्याचा थरारक प्रयत्न…
नाशिक! प्रेमीयुगुलाने हातात हात घेऊन मारली रेल्वेसमोर उडी…

