
बारामती! युवकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणारी मुलगी दहावीच्या परीक्षेत शाळेत आली पहिली…
पुणेः बारामतीत एका युवकाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. त्या मुलीने दहावीची परिक्षा दिली होती. ही मुलगी इयत्ता दहावीत शाळेत पहिली आली आहे. मात्र, तिचं हे यश पहायला आणि त्याचा आनंद घेण्यासाठी ती जगात नाही, त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर…
www.puneganpati.com
बारामतीतील कोहाळे खुर्द येथे युवकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या एका मुलीचा नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत 78.40 टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक मिळविल्याचे समोर आले आहे. मंगळवारी (ता. 13) दहावीचा निकाल लागला. त्यात ती मुलगी पहिली आल्याचे कळताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. स्वतःचे यश आणि कौतुक सोहळा पाहण्यासाठी तीच या जगात नाही, त्यामुळे गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला.
दरम्यान, तू माझ्याशी यात्रेपूर्वी लग्न कर, अन्यथा, तुझ्या घरच्यांना कोयत्याने उडवून टाकीन, अशी धमकी दिल्याने या मुलीने घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. याप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य आरोपीसह अन्य तिघांविरोधात पोक्सोसह तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल केला होता. दहावीची परीक्षा संपल्यानंतर तिने कोर्स सुरू केला होता, त्यासाठी ती रोज ये-जा करीत होती. 2 एप्रिल रोजी तिने कुटुंबीयांना तिला होत असलेल्या त्रासाची माहिती दिली होती. गावातील काही युवक दुचाकीवरून तिचा पाठलाग करीत त्रास देत होते. ‘तू जर माझ्याशी बोलली नाही तर तुझ्या घरातील कोणालाही जिवंत ठेवणार नाही, सर्वांची कोयत्याने मुंडकी उडवीन, शिवाय गावच्या यात्रेपूर्वी लग्न कर, अन्यथा तुझ्या घरच्यांना संपवणार,’ अशी धमकी तिला दिली गेली होती.
मुख्य आरोपीचे काही मित्र तिला वहिनी असे म्हणत चिडवत होते. सोशल मीडियावर देखील तिला काही मेसेजही पाठविण्यात आले होते. अखेर हा त्रास असह्य झाल्याने तिने 8 एप्रिल रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली होती. सध्या ते तुरुंगात आहेत. परंतु, आता दहावीच्या निकालानंतर या मुलीच्या यशानंतर पुन्हा या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
Video: पुणे शहरात भरदिवसा युवकावर कोयत्याने सपासप वार…
गुंड गजा मारणे मटण पार्टी प्रकरणी मास्टरमाइंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
पुणे जिल्हा हादरला! नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अतिप्रसंग…
पुणे जिल्ह्यातील युवती अन् नांदेडमधील युवक; शरीरसंबंधानंतर युवतीला सोडून पळाला…
बारामती पुन्हा हादरली! युवकाचा कोयत्याने वार करून खून…
बारामती हादरली! महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सपासप वार करत खून…

