
विवाहित महिलेवर शेतात बलात्काराचा प्रयत्न; चेहऱ्यासह शरिरावर केले 15 पेक्षा जास्त वार…
संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहित महिलेने (वय ३६) बलात्काराला विरोध केल्यानंतर आरोपीने महिलेवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचा चेहरा विद्रूप करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. अभिषेक तात्याराव नवपुते (वय 19, रा. घारदोन) याला चिकलठाणा पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी हा गेल्या अनेक दिवसांपासून पीडित महिलेचा पाठलाग करत होता. विवाहितेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. 2 मार्च रोजी विवाहिता सायंकाळी शेतात काम करीत होती. त्यावेळी आरोपीने शेतात जाऊन तिचा गळा दाबला व तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. विवाहितेने तीव्र विरोध केल्यानंतर आरोपीने गळा पकडून जमिनीवर आपटले. महिलेचा चेहरा, पोट, मान, हात, डोक्यात चाकूने 15 पेक्षा जास्त वार केले. त्यानंतरही त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, विवाहिता बेशुद्ध पडल्याने तिच्या डोक्यात दगड घालून ती मृत झाल्याचे समजून तो पसार झाला.
दरम्यान, शेताच्या दुसऱ्या टोकाला असलेली सासू घरी निघाल्यानंतर तिला रस्त्यामध्ये सून रक्तबंबाळ, बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर धक्का बसला. त्यानंतर कुटुंबाने तिला शहरात रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सोमवारी रात्री शुद्धीवर आल्यावर तिने पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर अभिषेकवर गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेच्या शरीरावर तब्बल 52 टाके पडल्याचे पोलिसांनी सांगितले.
विवाहिता मृत झाल्याचे समजून अभिषेक निघून गेला. सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाल्याचे कळताच तो गाव परिसरातील शेतात लपून बसला होता. अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपअधीक्षक पूजा नांगरे यांनी कारवाईच्या सूचना केल्या. निरीक्षक रविकिरण दरवडे, उपनिरीक्षक सतीश पंडित यांनी शोध घेत त्याला शेतातून अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड; तहान लागली अन्…
विवाहित महिलेचा खून केल्यावर प्रियकराने केला मृतदेहावर बलात्कार…
धक्कादायक! रिसॉर्टमध्ये युवतीने केला युवतीवर सलग तीन दिवस बलात्कार…
गोव्यात युवतीवर पाच जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार…

