अल्पवयीन मुलीसोबत सहमतीने शरीरसंबंध ठेवणे गुन्हाच; कोर्टाचा मोठा निर्णय…

नागपूर: अल्पवयीन मुलीसोबत सहमतीने शरीरसंबंध ठेवणे हा गुन्हाच आहे, असा निर्वाळा मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. शरीर संबंधात अल्पवयीन मुलीची सहमती अर्थहीन असल्याची स्पष्टोक्ती मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधासाठी दिलेल्या सहमतीला काहीच अर्थ नाही, असे हायकोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे. तसेच कोर्टाने अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीला बलात्काराच्या गुन्हा अंतर्गत सुनावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली आहे.

सप्टेंबर 2022 मध्ये विशेष कोर्टाने एका तरुणाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा ठोठावली होती. आरोपीने पीडित मुलीसोबत तिच्या सहमतीने शरीरसंबंध ठेवले होते. त्यामुळे विशेष कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात आरोपीने हायकोर्टात धाव घेतली होती. याठिकाणी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने विशेष कोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. अल्पवयीन मुलीच्या सहमतीने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले तरी तो गुन्हाच ठरतो, अशा प्रकारचा निर्वाळा कोर्टाने दिला आहे.

भंडारा जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीची तिच्याच भागात राहणाऱ्या एका युवकासोबत २०१६ मध्ये ओळख झाली होती. कालांतराने दोघांमधील ओळखीचं रुपांतर प्रेमात झाले. आरोपीनं लग्न करण्याचं वचन देऊन तेव्हा अल्पवयीन असलेल्या मुलीसोबत शरीर संबंध ठेवले. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. यानंतर आरोपीने पीडितेशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे मुलीने 2019 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. सप्टेंबर 2022 रोजी विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला याप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या निर्णयाविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, ते अपील हायकोर्टाने फेटाळले. शरीर संबंधात अल्पवयीन मुलीची सहमती अर्थहीन असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी…

बदलापूर अत्याचार प्रकरणात कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका…

मुंबईत न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर सुरू झाला अश्लील Video…

तोतया पोलिसाला न्यायालयाबाहेर पकडले पैसे उकळताना…

Video: न्यायालयाच्या आवारतच नवऱ्याला चपलेने चोपलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!