
पुणे शहरात पोलिसावर हल्ला; डोक्यात दगड घालून आरोपी फरार…
पुणे : पुणे शहरात एका दुचाकीस्वाराने पोलिसावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दुचाकी चालकाने पोलिसाच्या डोक्यात दगड घालून त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात राजेश गणपत नाईक (वय ४७) हे पोलिस हवालदार जखमी झाले आहेत. फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात हा प्रकार घडला. या घटनेनंतर दुचाकीस्वार फरार झाला असून, संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राजेश नाईक यांनी दुचाकी चालवताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला अडवले होते. याचा राग आल्याने दुचाकीचालकाने रस्त्यात पडलेला दगड राजेश नाईक यांच्या डोक्यात मारला. यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
राजेश नाईक हे भेकराईनगर चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करत होते. यावेळी नाईक यांनी दुचाकी चालवताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला अडवले होते. याचा राग आल्याने त्याने रस्त्यात पडलेला दगड राजेश नाईक यांच्या डोक्यात मारला. यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले आहेत. तर आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, मगरपट्टा परिसरात गेल्या महिन्यात म्हणजे 11 जानेवारीला एका युवकाने भररस्त्यात पोलिसाला मारहाण केली होती. या युवकानं प्रचंड नशा केली होती. दरम्यान, स्थानिकांनी या युवकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
पुणे शहरातील पोलिस अधिकाऱ्याने लोणावळ्यात घेतला गळफास…
पुणे शहरात टोळीला पकडायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला…
पुणे शहरात भररस्त्यात पोलिसाला युवकाने केली मारहाण…
पुण्यात आलेल्या विद्यार्थ्याने दारूच्या नशेत महिला पोलिस कर्मचाऱ्याला उडवलं…
महिला पोलिस हवालदाराची सख्ख्या भावाने रस्त्यातच केली कुऱ्हाडीने हत्या…

