पुणे शहरात दारू पार्टीदरम्यान पिस्तुल हाताळताना चुकून सुटली गोळी अन्…

पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात मित्रासह दारु पार्टी करायला गेला असताना पिस्तूल हाताळताना चुकून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एक इन्स्टंट एजंट गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला गोळी लागली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत

प्रदीप सावंत (वय ३९) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या गोळीबारानंतर त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पिस्तूल हाताळताना अचानक गोळी सुटल्यामुळे हा प्रकार घडला. घटनास्थळी दोनजण दारू पार्टी करायला गेले होते. यावेळी अनिल चव्हाण नावाच्या व्यक्तीने गावठी पिस्तूल आणले होते. दारु पित असताना आरोपी पिस्तूल हातळत होता. यावेळी अचानक चुकून गोळी सुटली आणि प्रदीप सांवत यांच्या खांद्याला लागली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आणि मिळालेल्या पुराव्यांमुळे पिस्तूल हाताळणीची चूक उघडकीस आली आहे. याबाबतचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करत अनिल चव्हाण याला अटक केली आहे. आरोपी चव्हाण याच्याकडे गावठी पिस्तूल कसे आले, याची चौकशी पोलीस करत आहेत. बेकायदेशीर पिस्तूल आणणे आणि सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्याचा प्रकार उघड झाल्याने पोलिसांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरातील सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून पिस्टल जप्त…

स्वारगेट पोलिसांनी रेकार्ड वरील गुन्हेगारास पिस्टल मॅग्जीनसह केली अटक…

पुणे शहरात पिस्टल जवळ बाळगणाऱ्यास सहकारनगर पोलिसांनी घेतले ताब्यात…

Video: पुणे शहरात लाखो रुपयांचे अंमली पदार्थ व पिस्टल जप्त…

पुणे शहरात रेकार्डवरील सराईत गुन्हेगारास पिस्टल व काडतुसह युनिट २ कडून जेरंबद…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!