
पुणे पोलिसांनी अवैद्य गावठी हातभट्टी केली कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
पुणे (संदिप कद्रे): काळेपडळ पोलिसांनी अवैद्य गावठी हातभट्टी दारू तयार करणारे भट्टी व त्यामाधील तयार हातभट्टी दारु पकडून ३०४५ लिटर गावठी दारू गाडीसह जप्त केली आहे. ८,७२,०००/-रु. कि.चा मुद्देमाल हस्तगत केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणून २०२४ च्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श अचासंहिताच्या दरम्यान पुणे शहरात अवैध धंदे / वाहतुक यांचेवर परिणामकारक कारवाई करणेबाबत पोलिस आयुक्त यांनी आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काळेपडळ पोलिस ठाणे, पुणे शहर यांनी तपासपथक अधिकारी व अंमलदार यांना अवैध धंदे व वाहतुक यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. वरिष्ठांनी दिलेले आदेश / सुचनांप्रमाणे दिनांक २४/१०/२०२४ काळेपडळ तपास पथकातीत अधिकारी व अंमलदार पोलिस उप निरीक्षक, संजय गायकवाड, पोलिस हवालदार ३९७७ दाऊद सय्यद, पोलिस हवालदार ७३१८ परशुराम पिसे, म.पो.नाईक स्नेहल जाधव ७१४३, पोलिस शिपाई २४३३ महादेव शिंदे, पोलिस अंमलदार ८६४८, अतुल पंधरकर, पो.शि. १००७० सद्दाम तांबोळी, पो.शि.८६८७ गणेश माने, पो.शि.८२१३ श्रीकृष्ण खोकले असे पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
पोलिस अंमलदार महादेव शिंदे यांना गोपनीय बातमी मिळाली की, संतोषनगर, कंजारभट, महंमदवाडी रोड पुणे येथे सचिन कचरावत व मानेश कचरावत हे दोघे मिळून त्याचे राहते घरापाठीमागे या ठिकाणी गावठी हातभट्टी दारु काढण्यासाठी लागणारे साहीत्य गोळा करुन, दारु काढणेची भट्टी लावून, गावठी हातभट्टी दारु गाळण्याचे तयारीत आहेत. त्याप्रमाणे मिळालेल्या बातमीच्या आधारे मानसिंग पाटील, वपोनि साो. काळेपडळ पोलिस ठाणे व वर नमूद पोलिस स्टाफ यांनी संतोषनगर, कंजारभट, महंमदवाडी रोड पुणे येथे सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली.
१. सतिश प्रकाश कचरावत, वय ४३ वर्षे, रा. संतोषनगर, कंजारभट वस्ती, तरवडेवस्ती, महंमदवाडी, पुणे,
२. मानेश प्रकाश कचरावत, वय ३५ वर्षे, रा. सदर, या दोघांना ताब्यात घेतले.
सदर ठिकाणावरुन तयार हातभट्टीच्या दारूने भरलेले एकुण ८७ कॅन व चार चाकी स्विफ्ट गाडी कार असा एकुण ८,७२,०००/- रु. कि. चा मुद्देमाल पुरावे कामी जप्त करण्यात आला आहे. त्याबाबत वानवडी पोलिस ठाणेस गु.र.नं. ५५६ / २०२४ प्रमाणे भा. न्या. सं. कलम १२३ प्रमाणे सह महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमसन १९४९ कलम ६५ (ब) (क) (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलिस निरीक्षक, अमित शेटे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही अमितेश कुमार, पोलिस आयुक्त पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, पोलिस सहआयुक्त पुणे शहर, मनोज पाटील, अप्पर पोलिस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काळेपडळ पोलिस स्टेशन, पुणे शहर, यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक, अमित शेटे, पोलिस उप निरीक्षक, संजय गायकवाड, पोलिस उप निरीक्षक प्रशांत लटपटे, पोलिस हवालदार ३९७७ दाऊद सय्यद, पोलिस हवालदार ७३१८ परशुराम पिसे, म.पो.नाईक स्नेहल जाधव ७१४३, पोलिस अंमलदार ८६४८, अतुल पंधरकर, पो.शि.१००७० सद्दाम तांबोळी, पो.शि. ८६८७ गणेश माने, पो.शि.८२१३ खोकले यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
पिंपरी पोलिसांमुळे माय-लेकांची दीड वर्षांनी झाली भेट अन् मिठी मारत फुटला अश्रूंचा बांध…
पुणे शहरातील तडीपार आरोपीस दरोडा व वाहन चोरीच्या पथकाने घेतले ताब्यात…
पुण्यात 138 कोटी रुपये किमतीचे सोनं आलं कुठून? महत्त्वाची माहिती…
मामा टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना सिंहगड रोड पोलिसांनी केली अटक…
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने पकडले तीन जणांना…

