
विकृती! पुणे शहरात समोशात आढळल्या ‘नको त्या वस्तू’…
पुणे : एका ऑटोमोबाईलच्या कँटिनमध्ये कर्मचाऱ्यांना समोसे दिले होते त्यामध्ये कंडोम, गुटखा आणि दगड आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली की, कंपनीने ज्याचं टेंडर रद्द केले होते त्याने व्यवसाय आणि कंपनीवरचा राग काढण्यासाठी हा प्रकार केला.
पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या या प्रकरणी तपास करताना पोलिसांना आढळले की, खाद्यपदार्थात कंडोम, दगड जाणीवपूर्वक मिसळले गेले होते. औंधमध्ये कॅटरिंग सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकाकडून या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आधी कँटिनला खाद्यपदार्थ पुरवत होता. मात्र कॅटरिंगमध्ये तक्रार मिळाल्यानंतर त्याचे टेंडर रिन्यू केले नव्हते. त्यामधून हा प्रकार घडल्याची माहिती २७ मार्च रोजी पुढे आली आहे.
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
कँटिनमध्ये कर्मचारी समोसा खात असताना त्यामध्ये कंडोम, गुटखा, पान मसाला आणि काही दगड आढळून आले. कॅटरिंग कंपनीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली असून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला अटकसुद्धा केली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘कॅटरिंगच्या ठेकेदाराने एका दुकानातून समोसे पुरवण्यासाठी ठेका दिला होता. पण कर्मचाऱ्यांमधून तक्रारी आल्यानंतर त्याचे टेंडर रद्द केले होते. दुसऱ्याला याचे कंत्रात दिल्यानं तो दुकानदार चिडला. त्याने राग काढण्यासाठी समोस्यात इतर गोष्टी मिसळून बदनामीचा प्रयत्न केला.’
हृदयद्रावक! उपचार करता न आल्यामुळे मुलीचा मृत्यू अन् वडिलांची आत्महत्या…
जयश्रीने सिगारेटचा धूर रणजितच्या तोंडावर सोडला अन् झाली हत्या…
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
पुणे जिल्ह्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

