पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना मोठा दणका…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करीत फिरणाऱ्या बुलेटस्वारांना शहर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. दोन दिवसांत तब्बल 571 बुलेटवर कारवाई करून सायलेन्सर जप्त करण्यात आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली असून जप्त केलेल्या सायलेन्सरवर वाहतूक पोलिसांनी बुलडोझर चालविला. यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली.

पुणे शहर परिसरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱयांची संख्या मोठी आहे. दुचाकी आणि विशेषतः बुलटेच्या सायलेन्सरवर बदल केल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात आवाज होतो. अशी वाहने रस्त्यावरील नागरिक तसेच इतर दुचाकीस्वारांना धडकी भरवितात. शाळा, महाविद्यालये, रुग्णालय परिसरातून जात असताना याचा सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच, ध्वनीप्रदुषणात मोठी वाढ होते. या सर्व पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी मागील दोन दिवसांत शहरात विशेष मोहीम राबविली. यामध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यानूसार शहरातील सर्वच भागात ही मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत सुमारे 571 दुचाकींवर कारवाई करून त्या जप्त करण्यात आल्या. विशेषतः हडपसर, कोरेगाव पार्क, विमानतळ, हांडेवाडी, डेक्कन, भारती विद्यापीठ भागात हे प्रकार सर्वाधिक असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले. कारवाई केलेल्या वाहनधारकांकडून पहिल्या गुन्ह्यासाठी हजार तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी दोन हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. तर, मॉडीफाय केलेले सायलेन्सरचा पुनर्वापर होवू नये, यासाठी पोलिसांनी ते जप्त केले. शुक्रवारी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात या सायलेन्सरवरून बुलडोझर चालवून ते निकामी करण्यात आले.

नागरिकांनो येथे करा तक्रार…
नियमबाह्य पद्धतीने सायलेन्सरमध्ये बदल करणे तसेच इतर वाहतूक नियमभंग करणाऱ्यांबाबत तक्रार करण्यासाठी नागरिकांनी 8087240400 या व्हॉट्सऍप नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

मॉडीफाय सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहील. दुचाकीस्वारांनी नियम पाळणे गरजेचे आहे
– शशिकांत बोराटे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर.

पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…

पुणे शहरात वाहतूकीत प्रायोगिक तत्वावर बदल; जाणून घ्या,पर्यायी मार्ग कोणते…

Video: खासदार अमोल कोल्हे यांनी बजावली वाहतूक पोलिसाची भूमिका…

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!