
PSI चा विवाहित शिक्षिकेवर वारंवार अत्याचार; माझे तिच्यावर प्रेम…
छत्रपती संभाजीनगर: पोलिस उपायुक्त कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने (PSI) एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेनं आरोपीच्या त्रासाला कंटाळून फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी पोलिस अधिकारी फरार झाला आहे. हरीश माधवराव खटावकर (वय ५३) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी ग्रेड पीएसआयचे नाव आहे.
पीडित महिला आणि आरोपी हरीश खटावकर यांची गेल्या ४ वर्षांपासून ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत खटावकर याने मे २०२५ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीने हॉटेलमध्ये काम असल्याचं सांगून तसेच घराचे इंटेरियर दाखवण्याच्या बहाण्याने पीडितेला घरी बोलवून लैंगिक शोषण केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पीडितेने या गोष्टीला नकार दिला असता, आरोपीनं तिच्या पतीला सांगून बदनामी करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केला.
View this post on Instagram
खटावकर हा पीडितेच्या मोबाईलवर मेसेज करत असल्याची माहिती तिच्या पतीला मिळाली. पतीने या संदर्भात खटावकरला फोन करून जाब विचारला असता, “माझे तिच्यावर प्रेम आहे,” असे उत्तर देऊन खटावकर याने फोन कट केला, असेही फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर बुधवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास खटावकर थेट पीडितेच्या घरी पोहोचला. तिथे पतीने पीडितेला घराबाहेर काढलं असता, खटावकर याने तिला बळजबरीने कारमध्ये बसवले. सय्यद निसार नावाचा व्यक्ती ही कार चालवत होता. कार चालत असताना खटावकर याने पीडितेला बेदम मारहाण केली. त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास तिचा मोबाईल हिसकावून घेत, तिला शहरातील दूध डेअरी चौकात उतरवून तो पसार झाला, असेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, खटावकर यांच्यावर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी हरीश खटावकर फरार झाला आहे. उपायुक्त कार्यालयाने या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल पोलिस आयुक्त (CP) प्रवीण पवार यांच्याकडे पाठवला असून, आरोपीवर लवकरच कडक कायदेशीर आणि खात्यांतर्गत कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पुणे! PSIचा कॅफेमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलंबन; अन् आता…
महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल…
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणातील PSI बदने याला जामीन; पाहा 3 अटी…
Surprise Video! लेक PSI झाल्यानंतर वर्दीतच घरी परतली; असू अन् हसू…
सख्ख्या भावासाठी दिलेली ‘डमी’ परीक्षा भोवली; PSIला पोलिस कोठडी…

