
पुणे जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् लॉजवर घेऊन गेला…
पुणे: एका अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवर प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यात घडली आहे. वैभव शिवाजी मुसळे (रा. कडूस, ता. खेड) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी सध्या आपल्या शिक्षणासाठी नारायणगाव येथे वास्तव्यास असून, तिने दिलेल्या फिर्यादीनंतर खेड पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याची नोंद केली आहे.
आरोपी वैभवने इंस्टाग्रामवरून पीडित मुलीशी संपर्क साधला होता. तिने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट अक्सेप्ट केल्यानंतर त्याने तिला प्रपोज केले आणि प्रेमाचे नाटक रचले. मुलीने सुरुवातीला स्पष्ट नकार देऊनही आरोपीने इंस्टाग्राम आणि फोनवरून तिला सतत त्रास देणं सुरूच ठेवले. ऑगस्ट 2025 मध्ये त्याने मुलीला पहिल्यांदा मंचर येथे बोलावले आणि तिथून आपल्या चारचाकी गाडीने पुणे-नाशिक महामार्गावरील एका लॉजवर नेले.

जैदवाडी येथील एका लॉजमध्ये नेऊन आरोपीने मुलीवर पहिल्यांदा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या घटनेने मुलगी प्रचंड हादरली होती आणि भीतीपोटी तिने कोणालाही काही सांगितले नाही. मात्र, त्याने पुन्हा 15 सप्टेंबर 2025 रोजी तिला खेड येथे बोलावलं आणि त्याच लॉजमध्ये नेऊन पुन्हा अत्याचार केला. शिवाय, सोशल मीडिया आणि फोनवरून सतत मानसिक त्रास देत होता.
दरम्यान, अखेर या त्रासाला कंटाळून पीडितेने आपल्या मामाच्या मदतीने खेड पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपी वैभव मुसळे याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेच्या अगतिकतेचा फायदा घेऊन वारंवार तिचे शोषण केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो (POCSO) कायद्यासह बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यात लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या पत्नीची हत्या…
पुणे जिल्ह्यातील प्राध्यापकाच्या चपला विहिरीच्या काठावर दिसल्या अन्…
पुणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर; मुलाची गळा चिरून हत्या…
पुणे जिल्ह्यात गरोदर महिलाचा आढळला मृतदेह; हातावर रविराज नावाचा टॅटू…

