
पुणे! नकुल भोईर हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; पत्नीला साथ देणारा अटकेत…
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांची हत्या त्यांच्या पत्नीने केल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, ही हत्या करताना तिसरा व्यक्ती तिथं असावा असा संशय पोलिसांना आला होता. आता या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळाले आहे.
नकुल भोईर आणि त्यांची पत्नी चैताली यांच्यामध्ये संशय घेण्यावरून कौटुंबिक वाद निर्माण झाले होते. दोघांमध्ये 23 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर भांडण झाले. रागाच्या भरात चैतालीने पती नकुल भोईर यांचा कपड्याने गळा आवळून निर्घृण खून केला होता. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी पत्नी चैतालीला ताब्यात घेतले होते. सुरुवातीला त्यांच्या पत्नीनेच पतीचा खून केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पोलिसांनी नकुल यांच्या पत्नीची चौकशी सुरू केली. अखेर पोलीस तपासात या हत्येत आणखी एकाचा सहभाग असल्याचे समोर आले. ही हत्या चैताली भोईर हिने एकटीने नव्हे, तर तिच्या परिचित सिद्धार्थ पवार याच्या मदतीने पूर्वनियोजित कट रचून केला. पोलिसांनी दोन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर अखेर सिद्धार्थ पवारला अटक केली असून, त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे.
दरम्यान, नकुल भोईर हे स्थानिक सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या पत्नीने नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी, यासाठी नकुल यांनी मोठी तयारी केली होती. जिला नगरसेवक बनवायचं होतं. त्याच पत्नीने नकुल यांची हत्या केली. नकुल भाईर हे परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते. पिंपरी चिंचवड भागात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. नकुल भोईर हे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी आणि विविध सामाजिक चळवळीत सक्रिय होते. चिंचवडगाव आणि शहरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी आग्रही असायचे. अशा सामाजिक कार्यकर्त्याची मध्यरात्री अचानक हत्या झाल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
View this post on Instagram
पुणे ! नकुल भोईर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; तिसरा कोण…
पुणे! नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनं पतीचा केला खून; चारित्र्यावरून संशय…
पुणे ! प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा कात्रज घाटात केला खून…
पुणे शहरात अनैसर्गिक संबंधातून खून करणाऱ्या आरोपीला शिरूरमधून अटक…
पुणे! पिंपरी-चिंचवडमध्ये युवतीची सपासप वार करून भररस्त्यात परप्रांतीयांनी केला खून…

