
पुणे जिल्ह्यात ऐन सणासुदीत पत्नीची हत्या अन् नवऱ्याची आत्महत्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात नवऱ्याने पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
दौंड तालुक्यातील रावणगाव मध्ये ही घटना घडली आहे. पती-पत्नीमध्ये घरगुती वाद झाल्यानंतर रागाच्या भरात अशोक गावडे याने पत्नी जयश्री यांचा गळा दाबून खून केला. पत्नी मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर अशोक गावडे याने राहत्या घरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. गावकऱ्यांना घटना लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. दोघांच्या मागे दोन मुले आहेत.
दसऱ्याच्या आदल्या दिवशी गावडे यांच्या घरातच पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला होता. मध्यरात्रीच्या सुमारास या वादातून अशोक गावडे यांनी पत्नी जयश्रीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांनी टोकाचं पाऊल उचलले. ऐन सणासुदीत अशा घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. याबाबत माहिती पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यात वाढदिवसानिमित्त शोभायात्रा; डीजेच्या गाडीने घेतला एकुलता एका मुलचा बळी…
पुणे जिल्ह्यात विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या…
पुणे जिल्ह्यात सख्ख्या भावानेच 83 वर्षीय भावाचा केला खून अन्…
पुणे जिल्हा हादरला! भावकीच्या वादातून पाडला रक्ताचा सडा; हात-पाय तोडले…
पुणे जिल्हा! तलाठ्याची युवतीसह आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले, पत्नीचे अनैतिक संबंध…

