कोल्हापूर! प्रियकराने लॉजवर पत्नीसारखीच केली प्रेयसीची क्रूरपणे हत्या..

कोल्हापूर: सांगली-कोल्हापूर रोडवरील रूकडी फाटा येथील सागरीका लॉजवर प्रियकर आणि प्रेयसी गेल्यानंतर वाद झाला. वादातून प्रियकराने प्रियसीची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमन सुरेश सरगर असे मृत महिलेचे नाव असून आदमगौस पठाण असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

प्रियकराने हातोड्याचे घाव घालून निर्घृणपणे खून केला आहे. प्रियकर पठाण आणि सुमन हे रुकडे येथील सागरिका लॉजवर गेले होते. मात्र, यावेळी प्रियकर पठाण आणि सुमन सरगर यांच्यात आर्थिक वाद झाला आणि त्यातून खून झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रेयसीची हत्या करणाऱ्या पठाणची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. लॉजवर नेऊन प्रेयसीला संपवणाऱ्या पठाणने यापूर्वी स्वत:च्या पत्नीची देखील क्रूरपणे हत्या केली होती. दरम्यान, आता त्याने आर्थिक वादातून प्रेयसी सुमन सुरेश सरगर हिला देखील क्रूरपणे संपवले आहे.

पत्नीची हत्या केल्यानंतर आदमगौस पठाण याचे बाहेर आल्यानंतर सुमन सरगर हिच्याशी प्रेम संबंध जुळले होते. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या गाठी-भेटी होत होत्या. मात्र, आदमगौस पठाण याने बायकोचे जे हाल केले तेच आता प्रेयसीचे केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोल्हापूर हादरलं! लिव्ह इन हत्याकांडाचा झाला थरारक शेवट…

कोल्हापूर! बहिणीची छेड काढल्याच्या रागातून मित्राची निर्घृण हत्या…

सांगली! गर्भवती महिलेची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…

वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने घेतला पतीचा जीव; १७ दिवसांपूर्वीच लग्न…

हॉटेलमध्ये शारीरिक संबंधानंतर विवाहित महिलेची प्रियकराकडून निर्घृण हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!