मुंबई हादरली! जोगेश्वरीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; बसला मानसिक धक्का…

मुंबई: मुंबईतील जोगेश्वरी पूर्व परिसरात एका 12 वर्षीय मुलीवर पाच जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पीडित मुलगी तिच्या काकांसोबत मुंबईतील जोगेश्वरी परिसरामध्ये राहते. 24 फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यानंतर ती बेपत्ता झाली होती. पीडित मुलीचे काका ड्रायव्हर असून त्यांनी 26 फेब्रुवारी रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा जोगेश्वरी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पीडित मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना रेल्वे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. यानंतर दादर रेल्वे पोलिसांनी तात्काळ जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क साधला. पीडित मुलीच्या जबाबानंतर आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि पोस्को कायदा अंतर्गत 5 आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर जोगेश्वरी पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या पाचही आरोपींना अटक केली आहे.

आरोपी हे एसी मेकॅनिक आहेत. शाळा सुटल्यानंतर मुलगी एकटी असल्याचे बघून आरोपी तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागातील घरी घेऊन गेले आणि तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. याप्रकरणी सीसी टीव्हीच्या मदतीने पोलिस पुढील तपास करत आहेत.

विवाहित महिलेवर शेतात बलात्काराचा प्रयत्न; चेहऱ्यासह शरिरावर केले 15 पेक्षा जास्त वार…

पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार; अंधारात ताई-ताई बोलला…

विवाहित महिलेचा खून केल्यावर प्रियकराने केला मृतदेहावर बलात्कार…

संतापजनक! महिलेवर अमानुषपणे बलात्कार अन् शरीरात ठोकले खिळे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!