भूषण गगराणी यांचा पीए असल्याचे भासवून लाखो रुपये उकळणारा जेरबंद…

नाशिक : मंत्रालयातील तत्कालीन मुख्य सचिव भूषण गगराणी यांचा पीए (PA) असल्याचे सांगून 71 लाख 50 हजारांची फसवणूक करणाऱ्या प्रकाश धोंडू कदम याला नाशिक पोलिस दलाच्या गुंडाविरोधी पथकाने जेरबंद केले आहे. लासलगाव परिसरातील विंचूर फाटा येथे सापळा रचून गुंडाविरोधी पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले आहे.

संकेत शिवाजी कोटकर यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सन 2023 मध्ये संशयित प्रकाश धोंडू कदम हे स्वतः महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील तत्कालीन मुख्य सचिव भूषण गगराणी यांचे पीए असल्याचे सांगून तसेच त्यांची मोठमोठ्या व्यक्तींची ओळख असल्याचे दाखवून संकेत शिवाजी कोटकर व साक्षीदार यांना सरकारी नोकरीला लावून देतो, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी 71 लाख 50 हजार रुपये उकळले होते. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात 6 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यातील संशयित प्रकाश धोंडू कदम (रा. बदलापूर, जि. ठाणे) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. संशयित आपल्या घरी न राहता कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर व संभाजीनगर आदी जिल्ह्यांत लपून फिरत होता. संशयित हा सातत्याने जागा बदलत असल्याने त्याची माहिती काढणे अवघड असतानाही गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी मानवी कौशल्य व तांत्रिक कौशल्य वापरून माहिती काढली. संशयित लासलगाव, निफाड या भागात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार तत्काळ गुंडाविरोधी पथकाचे पोलिस अंमलदार विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत व राजेश राठोड यांच्यासह पथक तयार करून लासलगाव येथे रवाना झाले.

संशयित हा लासलगाव येथे असल्याची माहिती मिळाल्याने लासलगाव परिसरात संशयिताच्या वर्णनानुसार स्थानिक लोकांकडून त्याची माहिती घेऊन विंचूरफाटा, लासलगाव, नाशिक येथे सापळा रचून संशयित प्रकाश धोंडू कदम यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पुढील तपासासाठी पंचवटी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिक हादरलं! मुलीनं लव्ह मॅरेज केलं म्हणून वडिलांनी आईला संपवलं…

नाशिकमध्ये मोकळ्या जागेत मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ…

नाशिकमध्ये बस दरीत कोसळली, 7 जण ठार, 15 गंभीर जखमी…

नाशिकमध्ये पत्नीसोबत प्रवास करणाऱ्या पतीची धावत्या रिक्षातून पुलावरून उडी…

नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला पोलिसाचा कापला गळा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!